पाचोरा, प्रतिनिधी | निर्मल सिडस्चे संस्थापकीय अध्यक्ष तथा माजी आमदार तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील त्यांच्या स्मारक स्थळावर अभिवादन करण्यात आले.
विजयादशमी हा त्यांचा जन्मदिवस असून दरवर्षी तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. मागील दोन वर्षांपासून जयंती दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील प्रांगणात “प्रेरणास्थळ” या नावाने त्यांचे स्मारक स्थळ असून त्याठिकाणी सर्वांनी अभिवादन करुन प्रेरणा स्थळावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तात्यासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक स्थळासमोर आठवणींचा कोलाज म्हणून “चित्र प्रदर्शनी” चे आयोजन करण्यात आले होते. हजार शब्दांनी साधणारी किमया फक्त एका फोटोने साध्य होऊ शकते याची प्रचिती या चित्र प्रदर्शनी मुळे आली आणि त्यांचा यशस्वी जीवन प्रवास या चित्रप्रदर्शनीने उलगडून दिला. यावेळी अभिवादन करण्यासाठी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, निर्मल सिडस् चे संचालक डॉ. सुरेश पाटील, डॉ. जे. सी. राजपुत, डी.आर. देशमुख, निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, श्रीमती कमलताई पाटील, मेहताबसिंग नाईक, दिलीप भाडांरकर, निर्मल सिडस् चे महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी, वसंत वायाळ, संशोधन समन्वयक आय. एस. हलकुडे, निर्मल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, नगराध्यक्ष संजय गोहील, सुनिता किशोर पाटील, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, संजय पाटील (भुरा आप्पा), माजी जि. प. सदस्य उध्दव मराठे, ॲड. दिनकर देवरे, गणेश पाटील, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, महाराष्ट्र ट्रान्सपोर्टचे संचालक रवी केसवाणी, शरद पाटे, सेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद पाटील, गणेश परदेशी, पप्पु राजपुत तसेच कृषी, शिक्षण, वैद्यकीय व सामाजीक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, समस्त पदाधिकारी व शिवसैनिक, शेतकरी तसेच निर्मल सिडस् चे सर्व कर्मचारी व अधिकारी, निर्मल इंटरनॅशनल स्कूल चे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.