वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव राष्ट्रीय महामार्गाजवळ लवकी नाला आहे. या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने ते रस्त्यावर आले आहे. यामुळे, शेतकऱ्यांना जीवघेण्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, नाल्याच्या दुसऱ्या बाजूला पन्नास शेतकऱ्यांचे शेत आहे.
पाटबंधारे विभागाने पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना या ठिकाणी राबवली आहे, परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूने ही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी साठले आहे ,त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, नाल्याच्या त्या बाजूला पन्नास शेतकऱ्यांची शेती आहे, या शेतामध्ये जायला हा एकच प्रवासी रस्ता असल्याने दररोज याच पाण्यातुन शेतकऱ्यांना प्रवास करावा लागत आहे, शेतामध्ये उगवून आलेली कपाशी वेचण्यासाठी मजूरही या पाण्यातून जावे लागत असल्याने नकार देत आहेत, त्यामुळे वेळीच याकडे प्रशासनाने लक्ष घालून पाण्याचा मार्ग काढून द्यावा अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.