Home Cities जळगाव सुबह का भूला शाम को वापस आया तो उसे भुला नही कहते...

सुबह का भूला शाम को वापस आया तो उसे भुला नही कहते : आ. भोळे (व्हिडिओ)

0
64


जळगाव, प्रतिनिधी  | सुबह का भूला शाम को वापस आया तो उसे भुला नही कहते…असे नमूद करत आज आ. राजूमामा भोळे यांनी भाजपकडे ४३ सदस्यांचे बळ असल्याचा दावा केला. आपला अजेंडा हा विकासाचाच असून यापुढेही आम्ही विकासाला साथ देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 

आपल्याकडे बहुमत असले तरी अद्याप अविश्‍वास प्रस्तावाचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आ. गिरीशभाऊ महाजन यांनी निर्देश दिल्यास आम्ही विकासाच्या मुद्यावरून शिवसेनेसोबत काम करण्यास तयार असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केला. आमच्याकडे बहुमत असल्याने सभा तहकूब करण्याची मागणी केली असल्याचा दावा आ. भोळे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.  जळगाव शहराचा विकास करणे हे आमचे ध्येय असल्याने आम्ही एकत्र काम नेहमीच तयार असल्याचे आ. भोळे यांनी सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1037054443800402

 


Protected Content

Play sound