यावल येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे निरंकार उपवास

यावल, प्रतिनिधी |  किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल व ज्युनिअर काँलेजचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील (व्हि.डी.पाटील) यांनी गुरूवार दि.७ घटस्थापनेपासून नवरात्रीनिमित्ताने ९ दिवस अन्नाविना निरंकार उपवासास प्रारंभ केला आहे. हे  नऊ दिवस  ते श्री राम मंदिरात निवास करणार आहेत.

 

 

विजयकुमार पाटील हे मंदीरात पहाटे ५ वाजता ते स्नानानंतर राम मंदिरातील हनुमान मंदीर व राम मंदीर येथील पुजा पाठ करत. या उपवासा दरम्यान विजयकुमार पाटील हे फक्त निंबुपाणी सेवन करीत असून फराळ किंवा दुसरे कोणत्याही प्रकारचे अन्न नानासाहेब घेत नाहीत.  विजयकुमार पाटील हे १९७० साली राम मंदीर, हनुमान मंदीर व मरीमाता मंदीर या तिनही मंदीरातील मुर्तींना पाण्याने स्नान करून पुजाअर्चा करीत असत. नानांची परमेश्वरावर खुप श्रद्धा असून त्यांनी श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था पंढरपुर येथे सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर येथे जाणाऱ्या भावीकांची निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था तेथे आहे. मागील वर्षी घटस्थापनेच्या दिवशीच विजयकुमार पाटील यांचे चिरंजीव व स्व.केतनदादा मल्टिपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच व्हि.मार्ट शाँपिंग माँल चे संचालक मनिष विजयकुमार पाटील यांना ऋत्वी आणि रूही या दोन जुडवा कन्यारत्न प्राप्त झाले होते. नवरात्रीतच देवीने  दोन नातींच्या रुपात आपल्या घरात जन्म घेतला असल्याचे त्यांची भावना आहे. दरम्यान,  देवीमातेची भक्ती करता यावी व नवरात्रीचे नऊ दिवस संसारीक मोहसोडून राममंदिरातच निवास करून उपवास करीत असल्याचे विजयकुमार पाटील यांनी सांगितले.  नवरात्रीच्या उपवासानिमित्ताने  राम मंदिरातच निवासाला असलेले विजुनाना राम मंदिरात पुजाअर्चा,वाचन,मनन व मोबाईलवर अध्यात्मीक संगीत ऐकत दिनचर्या पुर्ण करतात. ६९ वर्षे वय असलेले विजयकुमार पाटील यांच्या चेहऱ्यावर अन्न सेवन करत नसलेला कोणताही भाव दिसत नाही. ते उपवास अगदी आनंदीपणे करतात. त्यांना भेटायला गावासह परीसरातील पुरूष व महीलासह लहान मुलेही येत असुन ते सर्वांशी प्रेमाने गप्पा करतात तर पंडीत गुरूजी जगन अण्णा, लिलाधर महाराज, मधुकर पाटील हे विजुनानांना दररोज भेटायला येतात. विजयकुमार पाटील यांचे नवरात्रीचे ९ दिवसांचे निरंक उपवासांची विजया दशमीच्या दिवशी सांगता होणार आहे तर एका सेवानिवृत्त उपायुक्तांनी आपला आलीशान बंगल्यात न जाता नवरात्रीचे ९ दिवस राम मंदिरातच निवास करून धरलेले निरंकार उपवास हे किनगावसह परीसरात एक आदर्श निर्माण करणारे ठरत आहेत.

Protected Content