जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सेवा परिवार व कला सिध्दी फाऊंडेशनतर्फे मदतीचा हात

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील ओझर गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सेवाधर्म परिवार, कला सिध्दी फाऊंडेशन आणि हेल्पींग संस्थेतर्फे जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नुकतेच काहीदिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यासह जामनेर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वार्यावमुळे शेतकऱ्यांचे मोठे  नुकसान झालेले होते. शासन पातळीवर या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरीही अद्यापपर्यंत मदत मिळू शकलेली नसल्याने या शेतकऱ्यांच्या पुढे आता जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात राहत असलो तरी आपल्या रोजच्या अन्नासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठीया अडचणीच्या काळात आपण मदत उभी केली पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेअसा प्रस्ताव सेवाधर्म परिवाराच्या सदस्या आणि कलासिद्धी फाऊंडेशन च्या अध्यक्षा आरती शिंपी यांनी मागील महिन्यात ग्रुपवर  मांडला होता. प्रस्ताव अतिशय रास्त आणि महत्व पूर्ण असल्यानेसेवाधर्म परिवारातील अनेक सदस्यांनी आपल्या परीनेजास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न केला होता.

जामनेर तालुक्यात झालेल्या मदत कार्याचा शुभारंभ तहसीलदार अरुण शेवाळे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सेवा धर्म परिवाराचे अध्यक्ष चंद्रशेखर नेवे यांनी सदर मदत ही आपण समाजाचे काही देणे लागतो या सदभावनेने केली आहे असे सांगितले. सेवाधर्म परिवाराने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याची  मदत केल्याबद्दल गावातील शेतकऱ्यांनी सेवा धर्म परिवाराचे मनापासून आभार मानले आहे.

यावेळी कला सिद्धी फौंडेशन च्या अध्यक्षा आरती शिंपी,बारा बलुतेदार संघाच्या जिल्हाध्यक्षा भारती कुमावत ,सामाजिक कार्यकर्त्या बेबाबाई खोडपे तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते खैवाडे.सुरेश महाजन,बाळू पाटील,तलाठी अजय गवते,मंडळ अधिकारी विष्णू पाटील,ग्रामसेवक चव्हाण हे उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेशकुमार मुणोत ,हेल्पिंग हॅंड चे अभय मुथा यांचे सहकार्य लाभले.

Protected Content