जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
हितेश नाना बाविस्कर (वय-२५) रा. सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको असे मयत तरूणाचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, हितेश बाविस्कर हा आईवडीलांसह राहतो. मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान आज रविवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरात एकटा असतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांनी मृतदेह उतरवून तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी संदीप पाटील यांना मयत घोषीत केले. यावेळी डॉक्टरांनी मयत घोषीत करताच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला होता.
याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत हितेश बविस्कर यांच्या पश्चात आई लताबाई, वडील नाना बाविस्कर, पत्नी राणी आणि १ वर्षाची मुलगी आणि बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहे.