अमळनेर प्रतिनिधी | कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार मिलींद वाघ आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
अमळनेर तहसील कचेरी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या उपस्थितीत मिटिंग संपन्न झाली.
या बैठकीत लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या की, अमळनेर तालुक्यात कोरोना मुळे पती ,मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्व्हे करावा. अश्या निराधार महिलांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ,निराधार पेन्शन योजना ,तहसील कचेरीवर कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत २० हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत. ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यू नंतर कागदपत्र उपल्ब्ध नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत. एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस वात्सल्य समितीने करावे. समृध्द गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा. ज्या महिलांच्या कडे शेती आहे त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे. सुप्रीम कोर्टाच्या निकाला प्रमाणे सर्वाना ५० हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे. तालुक्यात एक पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ बाल संगोपन अनुदान महिना १२५० रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ ५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी अशी मागण्या प्रतिभाताई शिंदे यांनी केल्या.
दरम्यान, या बैठकीत तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या सोबत , ग्रामविकास अधिकारी ,लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे ,कार्यकर्ता सुप्रिया चव्हाण ,तेजस्विता जाधव यांच्या सह कोरोना मुळे विधवा झालेल्या एकल महिला व अमळनेर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रा अशोक पवार , संदिप घोरपडे , पन्नालाल मावळे, बन्सिलाल भागवत, रणजीत शिंदे, नरेंद्र पाटील, भारती गाला, वंदना पाटील, संजय पवार, रेणुप्रसाद, शांताराम सोनवणे, बालीक पवार, कलिंदर तडवी, किरण पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते .ह्या वेळी तहसिलदारांनी गावनिहाय सर्व्हे आठ दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वाना रेशनींग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत पुढील दर १५ दिवसातून एकदा मिटिंग घेण्याचे आश्वासन देत ही बैठक पार पडली.