खबरदारीचा उपाय म्हणून धरणगावातील कंटेनमेंट झोनमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करा : दीपक वाघमारे

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने घोषित केलेल्या कंटेनमेंट झोनमधील सर्व नागरिकांची खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी करावी. तसेच संशयितांचे स्वॅब घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष दीपक वाघमारे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

 

धरणगाव शहरातील कोरोना पॉझिटीव्ह वृद्ध महिलेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे बुधवारी रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील एक रूग्ण कोराना बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्याने धरणगावातील रूग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष दीपक वाघमारे यांनी तहसीलदार यांना एक निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,  प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघातील हायरिस्क झोनमधील संशयितांचे मोठ्या प्रमाणात स्वॅब घेऊन तपासणीला सुरुवात केली पाहिजे, जेणे करून भविष्यात कोरोनाच्या प्रसाराचा धोका कमी होईल, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष दीपक वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी आज नायब तहसीलदार डी.एम.वाडीले यांच्याकडे निवेदन सादर केले.

Protected Content