जळगाव, प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या ३६ हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ वाढवून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले आदि उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा साथरोग काळात तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना बरे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या पीएसए ऑक्सिजन प्लांटची मान्यवरांनी पाहणी केली. या कार्यक्रमासाठी ऑक्सिजन प्लांटचे समन्वयक डॉ. संदीप पटेल, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. विलास मालकर यांच्यासह डॉ. इम्रान तेली, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वैभव सोनार, डॉ. योगिता बावस्कर, डॉ.उमेश जाधव, असिस्टंट मेट्रेन आशा चिखलकर यांच्यासह अधिकारी दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, संजय चौधरी, संजय पाथरूट, महेश गुंडाळे आदि अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/864091710974086