रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील चोरवड चेक पोस्टवर आज पहाटे गुरांनी भरलेला ट्रक उपप्रादेशिक विभागाच्या पथकाने पकडला. यात ३० गुरांची सुटका करण्यात आली असून ट्रक रावेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवर असणाऱ्या चोरवड चेक पोस्टवर आज ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणारा ट्रक उपप्रादेशिक विभागाच्या पथकाने पकडला आहे. यात ३० गुरे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वांची सुटका करून जळगाव गौशाळेत रवाना केले आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सचिन नवले व पोलिस कर्मचारी घटनास्थळी जाऊन ट्रक ताब्यात घेतला व यातील गुरे जळगाव गौशाळेत रवाना करण्यात येणार आहेत.