वरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या फेकरी पुलाखालील रेल्वे रुळालगत एक उभे झाड जळत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या झाडाचा फक्त वरचा भाग जळत आहे. त्यामुळे रात्री झालेल्या वादळ-वाऱ्यामुळे वीज कोसळून या झाडाने पेट घेतल्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ.नी.तू.पाटील यांनी लागलीच भुसावळ रेल्वे ट्राफिक रूमला फोन करून परिस्थिती सांगितली. परंतु परंतु अद्याप झाडावरील आग विझवण्यात आलेली नसल्याचे कळतेय.
या संदर्भात अधिक असे की, फेकरी पुलाखाली रेल्वे मार्गाजवळ एक झाड जळत आहे. विशेष म्हणजे झाडाचा खालील भाग ठीक असून फक्त फांद्या जळत होत्या. त्यामुळे काळ रात्री झालेल्या पाऊस-वीज पडल्यामुळे झाडणे पेट घेतला असावा,असा अंदाज आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ.नी.तू.पाटील यांनी लागलीच भुसावळ रेल्वे ट्राफिक रूमला फोन करून परिस्थिती सांगितली. परंतु अद्याप झाडावरील आग विझवण्यात आलेली नसल्याचे कळतेय. पुढील अनर्थ टाळण्यासाठी लवकर हालचाल करणे आवश्यक आहे.