मुक्ताईनगर प्रतिनिधी | शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील हरताळा येथील तरूणांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे सर्व जण खडसे समर्थक होते.
याबाबत वृत्त असे की, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील हरताळा येथील शेकडो खडसे समर्थकांनी तसेच मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्र.१४ मधील एका समाजसेवकाने देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. काल रात्री आमदार पाटील व पदाधिकार्यांनी नवीन प्रवेशीतांना शिवबंधन बांधून तसेच गळ्यात भगवा रुमाल टाकून सर्वांना शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, युवासेना जिल्हाअधिकारी पंकज राणे , शहर प्रमुख गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी ईश्वर चक्रपाणी पुजारी, दिलीप माणिक सोनवणे, निलेश त्यागी, आतिश त्यागी, शुभम भरत सोळंके, चेतन भरत सोळंके, भारत रामा इंगळे, तुषार गणेश अवसरमोल, कुंदन मंगल भालचंद्र , आतिश शरद निकम, भोपाळ उत्तम भिल्ल, गणेश काळे, योगेश कचरे, संदीप बाळू कोळी, गजानन आगे, शाहरुख खान, मयूर कोळी, सिद्धार्थ लालू निकम, योगेश सुखदेव अढायके, रोशन संजय सोनार, सचिन निकम, गोलू संतोष बानाईत , राम भगत, सचिन लांडगे, पवन चांदेलकर, कल्पेश मोरे, विनोद कोळी , गणेश भोसले, सोहेल खान, शेख आरिफ, राहुल वाघमारे, अमोल कोळी , शुभम सोनार , शुभम शेळके, अमोल वसतकर, पिंटू शेळके, गणेश कोळी, गौरव शेळके, विलास तायडे ,तेजस बानाईत , उमेश बानाईत, संजय लालचंद निकम, रतिराम शेळके, पिंटू सोनवणे , मनोज तायडे, राधेश्याम बानाईत, शेख मोहसीन, विशाल कोळी, देविदास बोंडे यांच्या सह हरताळे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
यासोबत मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्र.१४ मधील समाजसेवक भूषण रमेश नायसे यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रवेश केलेले सर्व जण हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा समर्थक होते. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खडसे यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.