Home Cities अमळनेर ना. भुजबळ यांची आ. अनिल पाटलांच्या घरी सदिच्छा भेट

ना. भुजबळ यांची आ. अनिल पाटलांच्या घरी सदिच्छा भेट

0
101

अमळनेर-प्रतिनिधी | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

याबाबत वृत्त असे की, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ हे जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवस दौर्‍यावर होते.याच पार्श्वभूमीवर प्रामुख्याने ना.भुजबळ यांनी जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयांना भेट देत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या अनुषंगाने जळगाव येथील कार्यक्रम वरून परतताना छगन भुजबळ यांनी शनिवारी अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.या भेटी दरम्यान स्थानिक कार्यकर्ते यांनी त्यांचे ढोल ताशेच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound