मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भोसरी जमीन गैरव्यवहारात आपला हात नसल्याचा दावा केला असला तरी तेच या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आरोपत्रातून केला आहे. या आरोपपत्रात मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून फायनान्स मिळवला असतांनाच खुद्द एकनाथ खडसे यांनी आपल्या पत्नीच्या नावे ५० लाख ट्रान्सफर करून यातील ३८ लाख रूपये हे भूखंड खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा संदर्भ घेण्यात आलेला आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवर्ती मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या विरोधात अलीकडेच आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबतचे लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरील सविस्तर वृत्त आपण येथे क्लिक करून वाचू शकतात. या प्रकरणात गिरीश चौधरी हे अटकेत असून एकनाथराव खडसे यांची ईडीने दोनदा चौकशी केली आहे. तर मंदाताई खडसे यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांनी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागून घेतली आहे.
दरम्यान, ईडीने आपल्या आरोपपत्रात नेमके काय नमूद केले आहे याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने आज सविस्तर माहिती प्रकाशित केली आहे. आपण ही बातमी येथे क्लिक करून वाचू शकतात. या वृत्तानुसार, एकनाथराव खडसे यांनी ईडीसमोरच्या चौकशीत आपल्याला या जमीन प्रकरणात काहीच माहिती नसल्याचे सांगितले असले तरी आरोपपत्रात त्यांचीच महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. www.livetrends.news
या आरोपपत्रात म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांनी आपल्या पत्नीला ५० लाख रूपये त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. यातील ३८ लाख रूपये त्यांनी भोसरी येथील तो वादग्रस्त भूखंड खरेदी करण्यासाठी उपयोगात आणले. हा भूखंड ३ कोटी ७५ लाख रूपयांना खरेदी करण्यात आला असून यावर १ कोटी ७८ लाख रूपयांचे मुद्रांक शुल्क अदा करण्यात आले आहे. अशा प्रकारे हा पूर्ण सौदा ५ कोटी ५३ लाख रूपयांचा असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. यातील २ कोटी ३८ लाख रूपये हे मंदाकिनी खडसे यांनी तर ३ कोटी १५ लाख रूपये हे गिरीश दयाराम चौधरी यांनी भरलेत. www.livetrends.news मंदाकिनी खडसे यांना बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन कोटी रूपयांचे कर्ज दिले. ही कंपनी शेल कंपनी या प्रकारातील असून त्यांनी अनसिक्युअर्ड लोन या प्रकारातील कर्ज सौ. मंदाताई खडसे यांना दिलेत. तर त्यांचे पती एकनाथराव खडसे यांनी दिलेल्या ५० लाख रूपयांमधून त्यांनी ३८ लाख रूपयांचा वापर या जमीन खरेदीसाठी केला.
दरम्यान, गिरीश दयाराम चौधरी यांना देखील बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चार कोटी रूपयांचे लोन दिले. यासाठी श्री. चौधरी यांनी बॅक-डेटेड या प्रकारातील डॉक्युमेंट संबंधीत कंपनीला दिल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. यातीलच ३ कोटी १५ लाख रूपयांचा वापर त्यांनी भोसरी येथील भूखंडाच्या खरेदीसाठी केला. यासाठी ज्या कंपनीकडून पैसे कर्ज घेतले ती बेचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी असल्याचे ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. www.livetrends.news
ईडी समोरच्या चौकशीत एकनाथ खडसे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. आपण आपल्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये ५० लाख रूपयांची केलेली ट्रान्सफर ही नियमित असून पतीने पत्नीच्या अकाऊंटमध्ये पैसे शेअर करण्याइतपत नॉर्मल असल्याचा दावा त्यांनी चौकशीत केला होता. www.livetrends.news तथापि, एकनाथ खडसे यांचा यात पूर्ण सहभाग होता. त्यांनी हेतूपुर्वक आपली पत्नी व जावयाला ही जमीन खरेदी करण्यासाठी मदत केली. यासाठी पैसे सुध्दा दिलेत. आणि यातूनच तेव्हा २२ कोटी ६३ लाख खरे मूल्य असणारी जमीन ही ३ कोटी ७५ लाख रूपयांना विकत घेण्यात आली. या माध्यमातून नवीन भूसंपादन कायद्याच्या दरानुसार मोबदला मिळावा हा हेतू असून यासाठी एकनाथ खडसे यांनी थेट मदत केली असून तेच याचे सूत्रधार असल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्रामध्ये केला आहे. तर तत्कालीन स्थानिक उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्यावर देखील आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांनी रेडी रेकनर दर कमी करून हा भूखंड खरेदी करून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे ईडीचे असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.