Home Cities जळगाव उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन

उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन

0
28

जळगाव,प्रतिनिधी । जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन उद्या शुक्रवार दि. १७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहूमहाराज सभागृहात करण्यात आले आहे.

 

जळगाव जिल्हास्तरीय बैठकीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील हे असणार आहेत.

या कार्यक्रमाला राज्य संघटना मार्गदर्शक राम जगदाळे, राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, जरी उपाध्यक्ष जय मंगल जाधव, राज्य उपाध्यक्ष अमृता पवार, जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, राज्य संघटक संजू आधार वाडे, दिनकर अण्णा पाटील, राज्य सरचिटणीस सुभाष घरत, देवेंद्र खडसे, धुळे जिल्हाध्यक्ष पोपटराव सोनवणे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजन भोजने उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण तथा आरोग्य सभापती रवींद्र पाटील, महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी पशु संवर्धन सभापती उज्वला म्हाळके उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे आयोजन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे व उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ. निलम शशीकांत पाटील यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound