कोळन्हावी येथे कोरोना लसीकरण

यावल प्रतिनिधी । कोळन्हावी येथे आज जिल्हा परिषद सदस्या अरुणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क व दक्ष झाली असुन , तालुक्यात मोठ्या वेगाने लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असुन, तालुक्यातील कोळन्हावी येथे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम जिल्हा परिषदच्या सदस्या सौ.अरूणाताई रामदास  पाटील व यावल तालुका खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा संचालक आर.जी.नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ.मंजुषा विकास (गोटु) सोळंके.. (सरपंच) व सरपंचपती व ग्रा.प.सदस्य विकास (गोटु) जगन्नाथ यांच्या प्रयत्नाने आज दिनांक १५/०९/२०२१ वार  बुधवार रोजी कोळन्हावी गावासाठी कोविड १९ लसीकरणच्या पहिला डोस १८ वर्षावरील सर्व वयोगट यांनी प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला.

किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.मनिषा महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सौ. उषा पाटील (आरोग्य सहाय्यीका), सोनल चौधरी (समुदाय आरोग्य अधिकारी ) मंगला सोनवणे (आरोग्य सेविका),  जिवन सोनवणे ( आरोग्य सेवक), दिपक तायडे ( आरोग्य सेवक), चंद्रकांत सपकाळे सौ.जनाबाई ठाकरे (मदतीनीस)श्रीमती.सुनिता सोळंके (आशावर्कर), रजनी सपकाळे (आशावर्कर), दिपक सोळंके (संगणक परिचालक ग्राम पंचामत कोळन्हावी.), राजु सोळंके (शिपाई), केतन सोळंके (मदतीसाठी) व अंगणवाडी सेवीका व इतर शिक्षकवृंद या केलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्वांचे कोळन्हावीतील ग्रामस्थ मंडळी विशेष आभार मानले.

Protected Content