मुक्ताईनगर, प्रतिनिधी ।ऐनपूर येथील अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील ,पं. स. सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अल्पसंख्याक समाजातील युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात केल्यावर रोहिणी खडसे म्हणाल्या की, एनपूर येथील सर्व समाज नेहमी नाथाभाऊंच्या पाठीशी राहिला आहे. नाथाभाऊ यांनी एनपूर परिसराच्या विकासासाठी भरीव निधी आतापर्यंत दिला आहे. तुम्हा सर्वांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करते. यापुढे सर्वांनी एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करायचे असून येत्या स्वराज संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मायाताई बारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील, सोशियल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, निंभोरा सरपंच सचिन महाले, ग्रा. पं. सदस्य किशोर पाटील, शे. शाहरुख, अरविंद महाजन, भुषण पाटील, रोहन च-हा टे, सोनू पाटील, उपस्थित होते.
यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
अल्पसंख्यांक समाजातील शाहरुख शे. हमीद, शे. राजू शे. कुर्बान, समीर खान, समीर शे. सलीम, सरफराज खान फिरोज खान, मजर शे. जब्बार, सै. जाफर सै. रहमत, सगीर शे. शब्बीर, शे. शरीफ मुलतानी, असगर शे. इकबाल, सोहेब शे. हमीद, शाहरुख शे. मंन्नू, मण्यार आबु, शे. रिजवान, आमीन शे. कासम, शकिर शे शब्बीर, सलमान शे. युनूस, शब्बीर शे. इसुब, इरफान शे. कडू, आसिब शे. जलील, पठाण, सलमान शे. सत्तार, अशरफ मिया, मोसीन शे. अजीज, हमीद शे. इब्राहिम, शे. रेहान शे. आसिफ, सै. आसिफ सै. लयाकात शे. सुभान, तौफिक शे. रशीद, साहिल खान आसिफ खान, आकीब शे. हारूण, अजमल खान अय्युब खान या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.