पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य व गणेश मडंळाचे पदाधिकारी यांची उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांचा अध्यक्षतेखाली येथील पोलिस स्टेशनमध्ये बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीस नगराध्यक्ष, नायब तहसीलदार, विज वितरण कंपनीचे कर्मचारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. येणारा गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन गणेश उत्सव आगमन व विसर्जन वेळी मिरवणुक काढु नये. त्याबाबतच्या कोरोना अनुशगांने महाराष्ट्र शासनाकडील प्राप्त सूचना समजून सांगितले आहेत व सार्वजनीक गणेश मुर्ती ४ फुट व घरगुती गणेश मुर्ती २ फुट पेक्षा मोठी नसावी तसेच परवानगी फार्म भरू सोबत हमीपत्र जोडणे बंधनकारक असल्याच्याही प्रशासनातर्फे सुचना या बैठकी दरम्यान देण्यात आल्या.