Home Cities भुसावळ भुसावळात इनरव्हील क्लबतर्फे वॉटर कुलरची सुविधा

भुसावळात इनरव्हील क्लबतर्फे वॉटर कुलरची सुविधा


04673c21 9bcd 4c61 bbfb a75cfd6433c9

भुसावळ (वृत्तसंस्था) शहरातील उष्णतेची लाट व उष्माघाताची शक्यता पाहता वाटसरू व विद्यार्थ्यांची लहान भागवण्याच्या दृष्टीने शहरातील शारदा नगर परिसरात इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेल सिटीने ‘जल शितलक’ (वॉटर कुलर) उभारून पुढाकार घेतला आहे.

 

विविध समस्यांवर मार्ग शोधत समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लबने या उन्हाळ्यात शारदा नगरमधील एन.के. नारखेडे इंग्लिश स्कूलसमोर जल शितलक उभे करून पांथस्थ व विद्यार्थ्यांना थंड पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. क्लबच्या सदस्या सौ. स्मिता जीवन चौधरी यांनी सेवाभाव जपत या उपक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. या पाणपोईचे उद्घाटन सौ. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला क्लबच्या अध्यक्षा सौ. सुनिता पाचपांडे, सचिव डॉ. मृणाल पाटील, सदस्या सौ. स्मिता चौधरी, मोना भंगाळे, रजनी सावकारे, पल्लवी वारके, रेवती मांडे, सीमा सोनार व हेमलता सोनार यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound