अमळनेर प्रतिनिधी | प्रहार जनशक्ती पक्षाच्या भुसावळ येथे झालेल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
भुसावळ येतील तेली समाज मंगल कार्यालयात मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा मेळावा प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यात अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तालुका अध्यक्ष पदी गुलाब काशीनाथ पाटील (अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली. तर रविंद्र भगवान पाटील (धार)यांची युवकच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आले आहे.
उर्वरित कार्यकारिणीत पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी-रामचंद्र बबन पाटील (मुडी), विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी- राजेंद्र त्र्यंबक पाटील (गलवाडे ) यांची निवड करण्यात आली आहे.या सर्व मान्यवरांचा नियुक्त्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे,उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.