Home Cities अमळनेर अमळनेर बसस्थानकातून अल्पयीन मुलीला पळविले; पोलीसात गुन्हा दाखल

अमळनेर बसस्थानकातून अल्पयीन मुलीला पळविले; पोलीसात गुन्हा दाखल

0
117


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय तरूणी अमळनेर बसस्थानकाहून एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय तरूणी ही २५ ऑगस्ट रोजी आपल्या आजीसोबत गावाला जाण्यासाठी अमळनेर बसस्थानकात पोहचल्या.  बसस्थानकात असतांना स्वच्छतागृहातून जावून येते असे सागून अल्ववयीन मुलीला गोपीचंद बारकू पवार (भिल) रा. डाबली ता. शिंदखेडा जि. धुळे याने फूस लावून दुचाकीवर बसून पळवून नेला. हा प्रकार मुलीच्या आजीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोपीचंद पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे. 


Protected Content

Play sound