Home Cities पाचोरा पिंपळगाव हरेश्र्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कृष्णा भोये

पिंपळगाव हरेश्र्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कृष्णा भोये

0
63

पाचोरा, प्रतिनिधी ।  तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी कृष्णा भोये यांची नियुक्ती करण्यात आली असून आज (दि.२५) भोये यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या असून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या व या पोलिस स्टेशनमध्ये पहिल्या महिला अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांची एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांची नियुक्ती झाल्याचे आदेश काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी नव्याने आलेले कृष्णा भोये यांनी आज दि. २५ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्याकडून पदभार स्वीकारला. 

कृष्णा भोये हे यापूर्वी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन कार्यरत होते. यावेळी पी. एस. आय. डिगंबर थोरात व गावातील ग्रामस्थ यांनी नव्याने पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे स्वागत केले आहे. नविन बदलून येणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये हे पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्याचे स्वागत करण्यात आले. पिंपळगाव पोलीस स्टेशन येथील पी. एस.आय.डिगंबर थोरात यांनी शाल, श्रीफळ, फुल गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनच्या  नीता कायते यांचा निरोप समारंभ प्रसंगी व नुकतेच रुजू झालेलेकृष्णा भोये यांचा सत्कार सकल मराठा समाज, पिंपळगाव (हरेश्र्वर), विक्रम पाटील, तसेच उपाध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख भगवान पाटील आणि शिवसेना उपतालुका प्रमुख रवी गीते, ग्रा. पं. सदस्य अल्लाउद्दीन तडवी सर्व पोलीस कर्मचारी वृंद उपस्तिथ होते.

 


Protected Content

Play sound