बोदवड येथील मरीमाता महापूजा उत्साहात

बोदवड प्रतिनिधी । जागृत मरीमाता शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट बोदवड येथे सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात करण्यात येणारी मरीमाता महापूजा यंदा ही नुकतीच आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, सर्व नियमांचे पालन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण देखील करण्यात आले.

सद्यस्थितीत कोरोना व्हायरस (कोविड-१९) या प्रशासनाने दिलेले आदेश व सूचना या सर्वांचा विचार करत  नियमाप्रमाणे गर्दी न करता सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात करण्यात येणारी मरीमाता  महापूजा या वर्षी दि. २४ ऑगस्ट २०२१ रोजी फिजिकल Distancing व  Masks चे तंतोतंत पालन करून मंदिराचे पुजारी व संथापक श्री. देविदास राखोंडे व सभासद यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.

व जे.एम.डी ट्रस्ट यांनी वृक्षरोपण व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप प्रमुख पाहुणे यशोदास राखोंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई व जे एम डी ट्रस्ट चे अध्यक्ष निवृत्ती राखोंडे यांचे हस्ते करून कार्यक्रमाचे समारोपन करण्यात आले. मंदिराचे जीर्णोद्धाराचे उर्वरीत काम सुरू करण्यात येणार असल्याने वर्गणीदार यांनी देणगी देण्याचे आव्हान जागृत मरीमाता शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट बोदवड यांनी केले आहे. 8108280280

 

Protected Content