पाचोरा प्रतिनिधी । जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनंतर सोमवारी दि. ९ रोजी अव्वल कारकून, मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या बदल्याचे आदेश प्राप्त झाले आहे.
यात पाचोरा तहसिलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी वरद वाडेकर यांची कुळकायदा अव्वल कारकून, उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून अभिजित येवले यांची पाचोरा येथील पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक पदी, संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून भाऊसाहेब नेटके यांना ट्रेझरी अव्वल कारकून, पुरवठा विभागाचे अजिंक्य आंधळे यांची मंडळ अधिकारी म्हसावद ता. जळगांव, उमेश शिर्के यांची पूरवठा निरीक्षक पदाहून याच ठिकाणी पुरवठा अव्वल कारकून, उमेश पूरी यांना पूरवठा अव्वल कारकून पदाहून याच ठिकाणी पुरवठा हिशोब तपासणीस पदावर बदली करण्यात आली आहे
त्याचप्रमाणे कुष्णापूरी विभागाचे तलाठी मयूर आगरकर यांना सारोळा सजेत, तलाठी आर. डी. पाटील यांची पाचोरा शहर तलाठी, जयश्री जानराव यांना अंतुर्ली येथून खेडगाव (नंदिचे), भगवान काळुंखे यांना बिल्दी येथून पिंपळगाव खु”, भास्कर शाहने गाळण येथून सातगांव (डोंगरी), नदिम शेख यांना लोहाराहून नांद्रा, रुपाली रायगडे सातगांव (डोंगरी) येथून वाणेगांव सजा, निलम बेलदार कुऱ्हाड हून बिल्दी, प्रविण पवार कुऱ्हाड खु” हून कुऱ्हाड बु”, किर्ती चौधरी नांद्रा येथून अंत्तुर्ली, विजय चव्हाण वडगांव मुलाने येथून गाळण बु” येथे बदली करण्यात आली आहे.