शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

 

 

खामगाव : प्रतिनिधी । संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांनी आज (कामिका एकादशीदिनी )   सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास घेतला .

 

संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज निधन झाले आहे. तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे त्यांच्या प्रकृती नाजूक होती. परंतु कुठल्याही दवाखान्यात हलवू नका असे त्यांनी सांगितल्यामुळे  त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालावली

 

श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी आध्यात्मिकता व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून संपूर्ण जग गजानन महाराज संस्थान, शेगावकडे पाहत आहे. या मंदिर व्यवस्थापनाचे संचालन करण्याची जबाबदारी शिवशंकरभाऊ यांच्याकडे वयाच्या अठराव्यावर्षी श्री आज्ञेने आली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी स्वतःला या सेवाकार्यात अखंडपणे वाहून घेतले आहे. संस्थानच्या माध्यमातून विविध सेवाकार्य चाललेले महाराष्ट्रभर पाहायला मिळते. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती ही त्रिसूत्री पक्की करून भाऊसाहेब कार्य करत होते .

 

Protected Content