विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारा : आरपीआय (खरात गट)ची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । पुणे विद्यापीठाचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नामविस्तारास दिन ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत असतांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुले यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याची मागणी आरपीआय (खरात गट)तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनाचा आशय असा की,  पुणे विद्यापीठाचे नामांतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले करण्याचा निर्णय ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट २०१४ नामविस्तार समारंभ पार पडला.याचे औचित्य साधून ९  ऑगस्ट रोजी नामांतर वर्धापन दिन साजरा करण्या यावा. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा राज्य शासनाच्या माध्यमातून बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी आरपीआय खरात गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते समीर पटेल, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपक बिऱ्हाडे, ग्रामीण  युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश सोनवणे, शहर युवक अध्यक्ष मुकेश कोचुरे, अल्प संख्यांख जिल्हाध्यक्ष अजिज शेख, बापू बिराडे, बिऱ्हाडे  आदी  उपस्थित होते.

Protected Content