जळगाव प्रतिनिधी । शहरातील कासमवाडीत दंगल झाल्याची माहिती मिळताच शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीसांची ताफा दाखल झाली. मात्र सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी मॉकड्रील घेतल्याचे कळाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. आज बुधवारी दुपारी ३ वाजता अचानकपणे मॉकड्रील घेण्यात आले.
शहरातील सर्व पोलीस ठाण्याची यंत्रणा दंगल झाल्यानंतर किती अलर्ट राहतात हे पाहण्यासाठी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी आज मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अचानक मॉकड्रील घेतली. यावेळी कुमार चिंथा यांनी कंट्रोल रूममधून वायरलेसच्या माध्यमातून शहरातील शनीपेठ, शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, रामानंद नगरपोलीस ठाण्यांना निर्भया पथक आणि कंट्रोल रूममधून कॉलींग करून शहरातील कासमवाडी परिसरात दंगल झाल्याचा संदेश दिला. त्यानुसार एमआयडीसी, शनिपेठ, तालुका तसेच जिल्हापेठ, रामानंद या पोलीस ठाण्यांच्या कर्मचार्यांसह पोलीस मुख्यालयातील कर्मचार्यांचा ताफा काही वेळातच घटनास्थळी पोहचला. याठिकाणी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी प्रत्येक कर्मचार्यांना दंगलीचा फोन आल्यास अवघ्या दहा मिनिटात काठ्या, हेल्मेट या साहित्यासह घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणावी अशा सुचना केल्या. अचानकच्या दंगलीच्या फोन पोलीस कर्मचार्यांची एकच धावपळ उडाली होती. मॉकड्रील असल्याचे निष्पन्न झाल्यावर घटनास्थळी आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुटकेचा श्वास घेतला.