जळगाव संदीप होले/राहूल शिरसाळे । शहरातीन जुने बी.जे. मार्केटमधील गाळ्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आज जळगाव महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील व उपायुक्त संतोष वाहूळे यांनी मार्केटला भेट दिली असता व्यापाऱ्यांमध्ये भीती वातावरण पसरून त्यांनी दुकाने पटापट बंद केलीत.
शहरातील जुने बी.जे. मार्केटमधील राज ॲग्रो केअर दुकानावर शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत सील बंद कारवाई करण्यात येत होती. परंतू, दुकानदारांनी आयुक्तांशी चर्चेनंतर सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. यानुसार आज मनपा पथक जुने बी. जे. मार्केटमध्ये दाखल झाले असता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद करण्यास सुरुवात केली. मात्र, परंतू, आपण गाळे सील करण्यासाठी आलेले नसून चर्चेअंती तोडगा काढण्यासाठी आलेलो असल्याचे उपायुक्त प्रशांत पाटील व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी स्पष्ट यांनी केले. यासंदर्भात मार्केटमधील विनोद तराळ पाटील यांच्या दुकानात उपायुक्त द्वयीनी व्यापाऱ्यांशी बंद द्वार चर्चा केली. चर्चेनंतर मनपा पथक गाळे सील न करताच परत गेले. यावेळी गाळेधारक संघटनेचे राजेश कोतवाल यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले की , शुक्रवारी मनपा अधिकारी आले होते, त्यावेळी आम्ही त्यांच्या समोर आमच्या मागण्या मांडल्या होत्या. त्या मागण्यांच्या अनुषंगाने त्यांनी सकारात्मक चर्चा केली. आम्ही भरलेले पैसे वजा झालेले नाहीत, या व इतर विषयांबाबत दोन-चार दिवसात चर्चा करण्यात येणार आहे. आज दुकान सील करण्यासाठी आलेले नव्हते मात्र, व्यापाऱ्यांनी गैरसमजातून आपली दुकाने स्वतः हून बंद केलीत. अधिकारी व पदाधिकारी यांनी दुकाने उघडी करण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने उघडण्यात आली.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/159514876283682
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/960104744833937