Home धर्म-समाज आपदग्रस्त कुटुंबास आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मदतनिधीचा धनादेश सुपुर्द

आपदग्रस्त कुटुंबास आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मदतनिधीचा धनादेश सुपुर्द

0
58

सावदा, ता. रावेर, प्रतिनिधी | येथील अंगावर झाडाची फांदी पडून मृत झालेल्या क्रांती चौक भागातील रहिवासी चेतन पाटील यांच्या कुटुंबाला आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चार लाख रूपयांच्या मदतनिधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, सावदा येथे आज रोजी आ. चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे हस्ते काही महिन्यापूर्वी येथील क्रांती चौक भागातील चेतन पाटील तरुणाचे अंगावर झाडाची फांदी पडून यात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला होता, या कुटुंबास ४ लाखाचा मदतनिधी धनादेश याकुटुंबास सुपुर्द करण्यात आला यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, नगरसेवक राजेंद्र चौधरी,  फिरोजखान पठाण, शिवसेना तालुका उपप्रमुख शाम पाटील, शहरप्रमुख सूरज परदेशी, भरत नेहेते, नीलेश खाचणे, अभिजीत मिटकर, गौरव भैरवा, मनीष भंगाळे, मंडळ अधिकारी संदीप जैसवाल, तलाठी पाटील आदि उपस्थित होते, यानंतर त्यांनी शहरात विविध ठिकानी भेटी दिल्या.

 

 

 


Protected Content

Play sound