यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयामार्फत स्वराज कंपनीचे मिनी ट्रॅक्टर व ट्रॉलीचे लोकार्पण माजी आमदार रमेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
१५ वा वित्त आयोग निधीमधून हे ट्रँक्टर घेऊन किनगाव खुर्द ग्राम पंचायतीने या ट्रँक्टरचे लोकार्पण केले. या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल तालुक्याचे माजी आमदार रमेश चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव खुर्द ग्राम पंचायत चे सतत १७ वर्ष सरपंच राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी शुक्राम पाटील व पंचायत समितीचे माजी उपसभापती व सदस्य उमाकांत पाटील हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्राम पाटील यांनी केले. तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य उमाकांत पाटील, माजी.आ.रमेश चौधरी, शुक्राम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील, रवींद्र ठाकूर, किनगाव बु.चे माजी सरपंच व विकास सोसायटीचे चेअरमन टिकाराम चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू साळुंके, माजी उपसरपंच विनोद कोळी, विजय सपकाळे, सामाजीक कार्यकर्ते श्रावण कोळी, शांताराम कोळी, उत्तम महाजन माजी सरपंच निंबा तायडे, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते जुबेर शहा डाँ.योगेश पालवे, संजय वराडे,
जगदीश कोळी, संतोष कोळी किनगाव खुर्द चे सरपंच भुषण नंदन पाटील, उपसरपंच शरद अडकमोल ग्रा.प.सदस्य प्रशांत तायडे, बबलू कोळी, अनिता धनगर, अनिल पाटील, शाबरी तडवी, सीमा पाटील, राजमाला सपकाळे, हमिदा पिंजारी ग्रामसेवक भोजराज, फालक किनगाव बुद्रुकच्या सरपंच निर्मला पाटील, उपसरपंच लुकमान तडवी, ग्रा.प.सदस्य विजय वारे, किरण सोनवणे, लोकेश महाजन, मेहमूद शेख, सावित्रीबाई नायदे, प्रमेला पाटील, साधना चौधरी, स्नेहल चौधरी, भारती पाटील, सायरा तडवी, किनगाव बुद्रुकचे ग्राम विकास अधिकारी प्रदीप धनगर, संजय पाटील, लतीफ तडवी, युवराज झांबरे, बाळू पाटील इ.सह ग्राम पंचायत कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालक लिपीक राहुल सुरेश सोनवणे यांनी केले.