जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देण्यासाठी “Multidisciplinary National Conference on Management, Engineering & Science” या विषयाला अनुसरून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये कॉम्प्यूटर, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनीक आणि टेलीकम्यूनीकेशन, मॅनेजमेन्ट ॲण्ड सायन्स आदी विषयांवर संशोधन अहवाल सादर करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर के.सी.ई. सोसाटीचे कोषाद्यक्ष सुरेश चिरमाडे, इंडिया सॉफ्ट टेकनॉलॉजीचे व्यस्थापकीय संचालक.सुनील चोरे, आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, प्राचार्य डॉ.के.पी. राणे राष्ट्रीय परिषदेचे संमन्वयक प्रा.संजय सुगंधी व प्रा.प्रज्ञा विखार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. पी. राणे यांनी केले. प्रमुख अतिथी व वक्ते सुनील चोरे यांनी, संशोधकांना मार्गदर्शन करताना ॲटोमेशन, मॉडेलिंग, ऑर्टीफिशीअल इंटेलिजन्सचे महत्व पटवून दिले. संशोधकांनी आपल्या विषयासोबतच विविध तंत्रज्ञान आत्मसात करावे. आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेचे महत्व तसेच संशोधन कार्य UGC approved journals मध्ये प्रसिद्ध असण्याचे महत्व सांगितले.सदर कायक्रमाचे सूत्रसंचालन उर्वशी पंचारिया आणि प्रा. प्रज्ञा विखार यांनी आभारप्रदर्शन केले. कायक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी परिश्रम केले.