Home Cities अमळनेर ब्रेकींग : ‘त्या’ तरूणाचा खून अनैतिक संबंधातून; पत्नीसह प्रियकराला अटक !

ब्रेकींग : ‘त्या’ तरूणाचा खून अनैतिक संबंधातून; पत्नीसह प्रियकराला अटक !

0
119


जळगाव/अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तुषार चिंधू चौधरी वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मील, अमळनेर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. अनैतिक संबंधातून तरूणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. सागर चौधरी वय – 35 रा.दोंडाईचा जि. धुळे आणित पुजा तुषार चौधरी रा. प्रताप मिल, अमळनेर असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पुजासह वास्तव्याला होता. गुरूवारी ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला, यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निर्घृण खून करून पसार झाला होता. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हा घरी पोहोचलेला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी पारिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.

यात त्यांच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून शिंदखेडा येथून अटक केली. दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलीसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला देखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


Protected Content

Play sound