Home क्राईम उपमहापौरांवर हल्ला करणार्‍या प्रमुख आरोपीला अटक

उपमहापौरांवर हल्ला करणार्‍या प्रमुख आरोपीला अटक

0
103

जळगाव प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी महेंद्र राजपूत याला रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना २५ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यातील किरण शरद राजपूत व उमेश पांडुरंग राजपूत या दोघांना पोलिसांनी सोमवारीच अटक केली. तर मंगळवारी रात्री गुन्ह्यात वापरलेल्या एम.एच.४८ एफ १४२२ या क्रमांकाच्या कारसह मुख्य आरोपी महेंद्र राजपूत याला रात्री ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणातील भूषण बिर्‍हाडे व जुगल बागुल हे सध्या बेपत्ता आहेत.

आता महेंद्र राजपूत याला अटक करण्यात आल्यामुळे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावरील हल्ल्यातील तपासाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound