जळगावातील रस्त्यांचा प्रश्न ; दिपककुमार गुप्ता मनपा आयुक्तांचा उपरोधिक सत्कार करणार

जळगाव,प्रतिनिधी । जळगाव शहरातील रस्त्यांचा झालेला मृत्यू व त्यांची देखभाल करणाऱ्या यंत्रणेचा मृत्यू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता मनपा आयुक्तांच्या कार्यलयात जावून आयुक्तांना बुके देवून शोक व्यक्त करणार आहेत. 

 

सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव शहरातील चिखलमय व खड्डेयुक्त रस्त्यांबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिकेतर्फे यात सुधारणा करण्यात न आल्याने मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना बुधवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११  वाजता त्यांच्या कार्यालयात जाऊन बुके देऊन शोक व्यक्त करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन दीपककुमार गुप्ता यांनी केले आहे.

 

Protected Content