रावेर येथील बँकांवर त्वरित गुन्हे दाखल करा – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रावेर प्रतिनिधी । पीक विमा न भरल्याबद्दल बँकांवर खटले दाखल करण्याचे स्पष्ट आदेश असताना तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे हे गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई करत आहे. यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्‍यांना पत्र लिहून रावेर येथील बँकांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे की पिक विम्याची रक्कम शेतकऱ्‍यांच्या खात्यावर जमा न करणाऱ्‍या बँकावर गुन्हे दाखल करण्याचे तालुका कृषी अधिकारी  सचिव तक्रार निवारण समिती ,यांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही शासन निर्णय दिनांक 12 जुले , 2019 प्रमाणे तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी यांना नियुक्त करण्यात आलेले आहे हा विषय पूर्णपणे जिल्हा कृषी विभागाशी संबंधित असून पिक विम्याची रक्कम शेतकऱ्‍यांच्या खात्यावर जमा न करणाऱ्‍या बकांवर कारवाई करणेबाबतची जबाबदारी सदस्य सचिव, तालुका तक्रार निवारण समिती तथा तालुका कृषी अधिकारी यांची आहे.

याबाबत वारंवार मुदतवाढ देऊनही बँकांमार्फत शेतकऱ्‍यांच्या खात्यावर अनुदान वितरणाबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने अशा सर्व संबंधित बँकांवर नियमोचित कार्यवाही करण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांचीच आहे , ही बाब जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. तरी सदर प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना आपले स्तरावरुन निर्देश देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

Protected Content