जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी अर्बन सेल शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी मनोज लिलाधर वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथे काल २१ जुलै रोजी मनोज वाणी यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष विनोद देशमुख, लिलाधर तायडे, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, समन्वयक मुविकोराज कोल्हे उपस्थित होते.
नियुक्ती पत्राचा आशय असा की, आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येत आहे की; आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “अर्बन सेल्स शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदी जळगाव” नियुक्ती करण्यात येत आहे.आपल्या देशात शहरीकरण झपाट्याने चालू असल्याचे बघायला मिळते नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान आपल्यापुढे उभी टाकले आहेत. शहराचा विकास नियोजित शास्रोक्त व Sustainable होण्याच्या दृष्टीने यापुढे आपल्याला पावले उचलण्याची गरज आहे हे करीत असताना यामध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढविणे अपेक्षित आहे या व अशा प्रश्नांना संबोधित करण्यासाठी पक्षाचे “राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष नामदार श्री जयंतरावजी पाटील साहेब, मा. सौ. वंदनाताई चव्हाण प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी अर्बन सेल” यांनी राष्ट्रवादी अर्बन सेलची स्थापना केली. आपण या सेलच्या माध्यमातून वरील उद्देश यांना संबोधित करण्यासाठी तसेच शहराच्या विकास कामांमध्ये हातभार लावण्यासाठी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल अशी आशा व्यक्त करते. आपले हार्दिक अभिनंदन तसेच आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…