Home Uncategorized आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात कोरोनाचे नियम पाळून पूजन (व्हिडिओ)

आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात कोरोनाचे नियम पाळून पूजन (व्हिडिओ)

0
34

जळगाव संदीप होले । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आषाढी एकादशीनिमित्त जुने जळगावातील विठ्ठल मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोनाचे नियम पाळत भाविकांनी विठ्ठल रूख्माईचे दर्शन घेतले.

 

आषाढी एकादशीनिमित्ताने जुने जळगावातील श्री विठ्ठल मंदिरात महिलांनी गीता पठण, हरिपाठ, भजन गायन केले.  महापालिका आयुक्त सतिष कुळकर्णी तसेच श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी, उपाध्यक्ष प्रमोद नेमाडे, चिटणीस राजेंद्र खडके,  ट्रस्टी तथा माजी उपमहापौर सुनिल खडके, ट्रस्टी तथा माजी नगरसेवक रविंद्र पाटील, अॅड. आनंदा  सरोदे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर काळे, दत्तू कोल्हे, संजय चौधरी, राजेंद्र खडके यांनी विठ्ठल रूख्माईचे दर्शन घेवून कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1234855283623167

 


Protected Content

Play sound