Home क्राईम पाचोरा येथे विवाहितेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

पाचोरा येथे विवाहितेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

2rapecase 56 1

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेला पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घडना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एकावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागात ३० वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते. लग्नापुर्वी विवाहितेचे राहिम लाला शखे रा. नुराणी चौक, बाहेर पुरा याच्याशी ओळख होती. दरम्यान संशयित आरोपी रहिम हा विवाहितेला ब्लॅकमेल करून तिला फर्दापूर ता. सोयगाव जि.औरंगाबाद येथे अडीच महिन्यापुर्वी घेवून तिच्यावर अत्याचार केला. पतीची समाजात बदनामी करेल अशी धमकी देत पुन्हा अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत विवाहितेने पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पाचोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे करीत आहे. 

 


Protected Content

Play sound