जळगाव , प्रतिनिधी । राज्यातील तेली समाजाच्या वधू- वर परिचय पुस्तिका फाॅर्मचा लोकार्पण सोहळा पत्रकार संघाच्या सभागृहात मान्यवर व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात बहुसंख्य तेली समाज व्यापलेला आहे. विवाह बंधन जुळण्याकरिता तेली समाज बांधवांनी विवाह इच्छुक पाल्याचा परिचय या पुस्तिकेत देण्याचे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज युवक मंडळ यांच्या वतीने यावेळी करण्यात आले. महाराष्ट्रात बहुसंख्य तेली समाज उद्योग व्यवसायात तसेच विविध क्षेत्रात स्थिरावलेला आहे. यामुळे इतर जिल्ह्यातील व राज्यातील समाज बांधवांना आपल्या पाल्याचा विवाह करण्यास सोई चे होईल अशी पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. यात समाज एकत्रित करण्याचा उद्देश साध्य होणार असून अनेक वधू व वराचा परिचय सहज उपलब्ध होणार आहे. मध्यप्रदेश, गुजरात याभागातील तेली समाज बांधव देखील मोठ्या प्रमाणात विवाह इच्छुक नोंदणी करून सहभागी होत असतात. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोना या संकटाने घेरले असताना अनेक समाज उपयोगी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आले नाही. राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन म्हणून दोन वर्षात समाज एकत्रित झालेला नाही मात्र कोरोनाचे संकट काही प्रमाणात निवळले असताना प्रथमच वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन श्री संताजी जगनाडे महाराज युवक मंडळ करण्यात आले आहे.
वधू- वर परिचय पुस्तिकेच्या फार्मचे लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र प्रांतिक तेली सभा जिल्हाध्यक्ष के.डी. पाटील, रामचंद्र चौधरी , उद्योजक संतोष चौधरी , विजय चौधरी , डॉ. मणीलाल चौधरी , व्ही. आर. पाटील, डी. ओ. चौधरी शोभाताई चौधरी , निर्मलाताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव अनिल पाटील यांनी केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/548557379519368