अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑगस्टमध्ये

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । विद्यापीठ अनुदान आयोगाने  आता सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना परिक्षांबद्दलचे निर्देश दिले आहेत. परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिक्स पद्धतीने ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

२०२१-२२ च्या सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी आणि उरलेल्या रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना १ ऑक्टोबर रोजी नवं शैक्षणिक वर्ष सुरू करावं अशा सूचना आयोगाने केल्या आहेत.

 

 

यूजीसीने सांगितलं की १२वीच्या सर्व बोर्डांच्या परिक्षांचा निकाल ३१ जुलैपर्यंत लागेल. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. सत्र परीक्षा घेण्याचा किंवा सत्र संपल्यानंतर सुट्ट्या देण्याचा निर्णय त्या त्या शिक्षणसंस्थांचा राहील.

 

Protected Content