ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा : महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची मागणी

जळगाव,प्रतिनिधी ।  ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 

गवळी समाजाचे राष्ट्रीय समन्वयक व माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर  व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी,कार्याध्यक्ष अशोक भाले यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र शासनाने ओ.बी.सी.समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे भविष्यातील ओ.बी.सी.समाजाचे राजकीय व सामाजिक जिवन धोक्यात आले आहे.  याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करावी व जातीनिहाय जनगणना करून त्वरित अहवाल पाठवावा व ओ.बी.सी.आरक्षण पुर्ववत करावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी, विभागीय प्रतिनिधी संतोष जानगवळी,तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल यादबोले, युवा जिल्हा कार्याध्यक्ष उमाजी गठरी, युवा जिल्हा उपाध्यक्ष शरद जानगवळी आदी उपस्थित होते.

Protected Content