शिरसोलीत कामगार महिलांसाठी कार्यशाळा

जळगाव : प्रतिनिधी ।  शिरसोली प्र बो गावात लोकहित गुरु रविदास फाऊंडेशन यांच्यावतीने नाशिकच्या केंद्रिय कामगार शिक्षण  मंडळाच्या सहकार्याने कामगार महिलांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती 

या कार्यशाळेला नाशिक कामगार शिक्षण मंडळाच्या शिक्षणाधिकारी सौ. सारिका डफरे यांनी उपस्थिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष   रवि नेटके यांनी कार्यशाळा आयोजनासाठी पुढाकार घेतला होता   प्रत्येक विषयावर वेगवेगळे प्रशिक्षक बोलवण्यात आले होते. आरोग्य विषयावर डॉ. अपर्णा मकासरे , बचत गट विषयावर शंकर इंगळे , अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रा. डिगंबर कट्यारे व प्रा. दिलीप भारंबे  आणि फिनाईल कसे तयार करावे याविषयी सौ. वनिता वाघ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नितीन नेरकर यांचे सहकार्य मिळाले.

यावेळी ग्रामपंचायत  सदस्या  सौ. रुपाली नेटके, सौ. श्रद्धा काटोले, सौ. शितल खलसे, सौ. आशाबाई बारी, सौ. उषा पवार, सौ. फौजिया खान,  प्रवीण बारी,   डिगंबर बारी , सरपंच  प्रदिप पाटील, उपसरपंच  समाधान जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल बाविस्कर यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव प्रदिप गवळे यांनी मानले 

 

Protected Content