राज्य सरकार तर मुगल व इंग्रजांपेक्षाही जुलमी ! : बंडातात्यांच्या मुक्ततेसाठी मोर्चा ( व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | ज्येष्ठ किर्तनकार तथा वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू बंडातात्या कराडकर यांची राज्य सरकारने मुक्तता करावी या मागणीसाठी आज भाजप आध्यात्मीक आघाडीने मोर्चा काढला. यात राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा वारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. या वर्षी कोरोनाची रूग्णसंख्या कमी असल्यामुळे वारीला परवानगी द्यावी अशी मागणी ज्येष्ठ किर्तनकार तथा वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू बंडातात्या कराडकर यांनी केली होती. सरकारने दहा वारकर्‍यांसह वारीची परवानगी देण्यात आली असतांना ते प्रत्यक्षात निघाले तेव्हा सरकारने त्यांना स्थानबध्द केले. या पार्श्‍वभूमिवर, आज भाजप आध्यात्मीक आघाडीने शहरातून मोर्चा काढत राज्य सरकारचा निषेध केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या शासकीय निवासस्थानापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यात जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे हे स्वत: टाळ वाजवत सहभागी झाले. टाळ-मृदंगाच्या तालावर सरकारचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला.

या मोर्चात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आध्यात्मीक आघाडीचे हभप जळकेकर महाराज, हभप सागर पाटील महाराज यांच्यासह अन्य सदस्य आणि वारकरी सहभागी झाले होते. याप्रसंगी जळकेकर महाराजांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, कोरोनाची आपत्ती आम्हालाही माहिती आहे. मात्र यंदा स्थिती थोडी सुधारलेली आहे. यामुळे मर्यादीत प्रमाणात का होईना वारीला परवानगी हवी होती. मात्र मोगल वा इंग्रजांपेक्षाही सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने वारकर्‍यांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे. यामुळे सरकारने त्वरीत बंडातात्या कराडकर यांची मुक्तता करावी अन्यथा राज्यभरात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुध्दा जळकेकर महाराज यांनी याप्रसंगी दिला.

खालील व्हिडीओत पहा भाजप आध्यात्मीक आघाडीचा मोर्चा…

https://www.facebook.com/508992935887325/videos/4391898937516670

Protected Content