एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील धरणगाव चौफुलीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. सतिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या विरोधात आज दि. ९ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता गॅस, पेट्रोल, डिझेल, खताच्या दरवाढीच्या निषेधार्थ रास्तारोको, सायकल रॅली व धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.रास्तारोको मुळे जवळपास वीस मिनिटे धरणगाव चौफुलीवर रहदारी ठप्प झाली होती.यानंतर डॉ सतिष पाटील यांनी केंद्रसरकरचा निषेध करत आपल्या कार्यकर्त्यासह आंदोलनाचा मोर्चा थेट सायकल रॅली द्वारे तहसील कार्यालया पर्यंत काढण्यात आला.याप्रसंगी तहसील आवारात काही वेळ धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी यांना निवेदन देण्यात आले.डॉ सतीश पाटील आपल्या मनोगतात मोदी सरकारचा समाचार घेतला तसेच अधिवेशनात गैर वर्तन करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांवर टीकास्त्र सोडून आपल्या या अमदारांचाच नाही तर भाजपचाच निषेध करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले.शेवटी आपल्या येत्या एरंडोल नगरपालिकेच्या निवडणूकित राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष निवडून आणायचा असुन गेल्या निवडणूकित राष्ट्रवादीचे सर्वात जास्त सद्स्य असूनदेखील अध्यक्ष पदापासून लांब राहावे लागले याची खंत व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.राजेंद्र देसले, तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मनोज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.सुभाष देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, सहकार बोर्ड संचालक सुदाम पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर बडगुजर, पारोळा तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलु चौधरी, जिल्हा सरचिटणीस विश्वास पाटील, युवक तालुकाध्यक्ष किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकास साळुंखे, किसानसेल तालुकाध्यक्ष रामधन पाटील, उमेश देसले, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष मंजुषा देसले, गुंजन चौधरी, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अँड.अहमद सैय्यद, युवक जिल्हा सरचिटणीस कपील पवार, जिल्हाकार्यकारणी सदस्य रविद्र देवरे, दशरथ पाटील तळई, विजय पाटील तळई, युवक शहराध्यक्ष नरेश भोई, दशरथ चौधरी, नगरसेवक अस्लम पिंजारी, अशफाक बागवान, नगरसेविका वर्षा शिंदे, ईश्वर बिर्हाडे, ओ.बी.सी. सेल शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, सरपंच रोहिदास पाटील, खेडगांव तांडा सरपंच दिनेश पवार, जवखेडे खु सरपंच गोपाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील रवंजा, किशोर पाटील खर्ची, एकनाथ पाटील, एन.डी.पाटील विखरण, भिकन खाटीक नागदुली, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थीत होते.