भुसावळ विभागातून पॅसेंजर रेल्वे गाडया पूर्ववत सुरु करा : मनसेची मागणी

यावल, प्रतिनिधी | भुसावळ रेल्वे विभागातुन सुटणाऱ्या ग्रामीण प्रवाशांची लाईफलाईन म्हणुन ओळख असलेली पॅसेंजर रेल्वेगाडया पुनश्च सुरू करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भुसावळ विभागाचे प्रबंधक एस. एस. केडीया यांच्याकडे  निवेदनाव्दारे केली आहे .

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक एस. एस. केडिया यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील एक वर्षापासुन संपुर्ण देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी संकटाच्या पार्श्वभुमीवर आपल्या विभागातून सद्य परिस्थितीला प्रवासांसाठी केवळ विशेष रेल्वेगाडया चालविण्यात येत आहे. आपल्या विभागातून ग्रामीण जनतेच्या दळण वळणाचे साधन पॅसेंजर रेल्वेगाडया बंद असल्याकारणाने चाकरमाने आता एसटीचा आधार घेत असे. मात्र, आता एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ केली असल्याने ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना रेल्वे शिवाय पर्याय नाही. मनमाड , चाळीसगाव , पाचोरा , रावेर , यावल , जामनेर व भुसावळ येथुन जळगावास येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठया प्रमाणावर आहे. कोरोना काळातील बंद केलेली रेल्वे सेवा अनलॉकनंतर हळुवार रेल्वेची सेवा ही पुर्वपदावर येत आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या कोवीड१९च्या नियमांचे पालन करीत काही विशेष रेल्वेगाडया सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्याचा म्हणावा तसा फायदा जिल्हावासीयांना होत नाही.  यावेळी दिल्ली, बेंगरूळ, कोलकाता, हैदराबादहुन येणाऱ्या सर्व रेल्वेगाडयांचे आरक्षण फुल येत असल्याने जळगावसह जिल्ह्यातील प्रवासांचे तिकीट वेटींगवर असल्याचे दिसुन येत असते. आता देशातील कोरोनाची परिस्थितीत सुधारणा झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रवासांच्या हक्काची नाशिक भुसावळ शटल , पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस , मुंबई भुसावळ पॅसेंजर , भुसावळ सुरत या पॅसेंजर रेल्वेगाडया अद्याप ही बंद आहेत. दरम्यान दिवाळीचा  सण तोंडावर आला असून , एसटीने केलेली  भाडेवाढ व अवैद्य प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनधारकांकडून प्रवासांची आर्थिक लुट करण्यात येत आहे. तरी आपल्या विभागातुन सोडण्यात येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या त्वरीत सुरू कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तात्काळ ही सेवा सुरू न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.

या निवेदन देतांना मनसेचे जिल्हा अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे , जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, मनसे भुसावळ शहराध्यक्ष विनोद पाठक , यावल शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , यावल तालुका उपाध्यक्ष शाम पवार, आबीद कच्छी , भुसावळ शहर उपाध्यक्ष प्रतिक भंगाळे,नेहल कुरकुरे , उर्वशी गोसावी , अनिल सपकाळे, सतोष जावरे, शुभम गायकवाड , ज्ञानेश पाटील , नुकुल महाजन , योगेश जवरे, गौरव कोळी आदी पदधिकारी यावेळी उपस्थित होते .

Protected Content