मुंबई प्रतिनिधी | भीमा कोरेगाव प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष नोंदविणार आहे.
पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
लक्षणीय बाब म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झालाअसून यात निरपराध व्यक्तींना गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.