जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या चरित्र्याचा संशय आणि अपशकुनी म्हणून मारझोड करणाऱ्या पतीसह सासु सासऱ्यांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील असोदा येथील माहेर आलेल्या २६ वर्षीय विवाहिता यांचा विवाह २ मे २०२१३ रोजी पारोळा तालुक्यातील ढोली येथील विजय उर्फ सोनल झुलाल पाटील याच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सहामहिन्यानंतर पती विजय पाटील हा पत्नी ज्योतीवर चरित्र्याचा संशय घेवून मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच तुझ्या वडीलांनी लग्नात मानपान दिला नाही म्हणून सासु सरला झुलाल पाटील आणि सासरे झुलाल धुडकू पाटील रा. ढोली ता. पारोळा यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. काल बुधवारी ७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विवाहिता आईवडीलांसह जळगाव तालुका पोलीस ठाणे काठून पती विजय पाटील याच्यासह सासू व सासरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विलास शिंदे करीत आहे.