रावेर पुरवठा विभागाची चौकशी

 

 

रावेर : प्रतिनिधी । रावेर पुरवठा विभागाची चौकशी लवकरच  पूर्ण होणार आहे. चौकशी अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे देण्यात येणार आहे. प्रशासकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय आहे

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्कालीन पुरवठा निरिक्षक यांना जबाबदार धरून १० मे रोजी तडका-फडकी बदली केली होती. दोन महिन्यां पासुन चौकशी सुरु असून लवकरच चौकशी पूर्ण होणार आहे

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चौकशीची जबाबदारी फैजपुरचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांच्याकडे दिली  कोणी कर्तव्यात कसूर केला ? कोणाला जबाबदार धरले ? कोणावर ताशेरे  ओढण्यात आले ? याची  उत्तरे चौकशी अहवालमध्ये  असणार आहे.

 

रावेर पुरवठा विभागात शासकीय अर्जात परस्पर बदल करणे,अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे,राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे असे ठपके संशयितांवर असल्याचे सांगण्यात येत आहे

Protected Content