Home Cities जळगाव एसटीचे ‘ते’ दोघे कर्मचारी निलंबीत

एसटीचे ‘ते’ दोघे कर्मचारी निलंबीत

0
102

जळगाव प्रतिनिधी | आगार व्यवस्थापक कार्यालयाच्या समोरच हाणामारी करणार्‍या दोन एसटी कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे.

एसटी महामंडळातील जळगाव आगारात आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयासमोरच वाहतूक नियंत्रक शिरीष चौधरी व लिपिक विकास नन्नवरे या दोन कर्मचार्‍यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे येथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची दखल घेऊन दोघांना आगार व्यवस्थापक पंकज महाजन प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून निलंबित केले आहे.

या दोन्ही कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने एसटी कर्मचार्‍यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. दरम्यान, संप सुरू असतांनाच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली असतांना याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound