मंत्रीमंडळ विस्तारावार काँग्रेसची टीका

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाचे वाटप करण्याचा एकमात्र निकष म्हणजे राहुल गांधी यांच्याविरूद्ध ट्विट करण्याची क्षमता असणे असे काँग्रेसने  म्हटले आहे.

 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे. “कोणालाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी राहुल गांधींविरूद्ध ट्विट करण्याची क्षमता असावी हा एकमेव पात्रता निकष आहे आणि इतर काहीही नाही.” ते आपल्या देशासाठी, त्यांच्या सरकारसाठी किंवा त्यांच्या आदेशावर काय करीत आहेत याने काहीही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत खेरा यांनी हे वक्तव्य केले. कॉंग्रेसने गेल्या महिन्यात व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आणून दावा केला होता की जयपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते निंबा राम आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राजाराम गुर्जर एका कंपनीशी ते चर्चा करत आहेत. राजस्थानमधील भाजपाच्या शासनकाळात या कंपनीला कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट कंपनीला देण्यात आले होते.

 

ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंगची तपासणी केल्यानंतर राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निंबा राम आणि गुर्जर यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे खेरा यांनी मंगळवारी सांगितले. गेल्या आठवड्यात गुर्जरला अटक करण्यात आली होती.

 

निंबा राम यांच्याविरोधात काय कारवाई करणार असा सवाल खेरा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना केला. ते म्हणाले, “देश तुमची वाट पाहत आहे आणि आपल्याकडे पाहत आहे.” या प्रकरणात सहभागी असलेल्या कंपनीने त्यांच्या कार्यालयात किंवा या सरकारच्या अन्य कार्यालयांसाठी काही काम केले आहे का, असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.

 

Protected Content